Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुलगी झाली हो' मालिकेतल्या रोहनला घरातूनच मिळालं अभिनयाचे बाळकडू, तो आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:54 IST

वडिलांप्रमाणे त्यानेही अभिनयक्षेत्रात एंट्री करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासूनच सृजन देशपांडेला अभिनयाची आवड होती.लहानपणाची त्याला अभिनयाचे धडे घरातूनच मिळयाला सुरुवात झाली होती.

बी-टाऊन असो किंवा मग मराठी चित्रपटसृष्टी सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते.आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत.आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिलेली नाही.अनेक मराठी कलाकारांची मुलांनीदेखील अभिनयक्षेत्रात एंट्री करत रसिकांचे मनोरंजन करत आहेत.

'मुलगी झाली हो' मालिका रसिकांची आवडती मालिका आहे.सुरुवातीपासूनच मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.मालिकेचे कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे मालिकेला रसिक खिळून आहेत. या मालिकेमुळे कलाकारही आज घराघरात प्रसिद्ध आहेत.मालिकतेल्या भूमिकांमुळेच कलाकारांनाही वेगळी ओळख मिळाली आहे.रिल लाईफप्रमाणे त्यांच्या रिअल लाईफविषयीही जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो.मालिकेतला अशाच एक कलाकराविषयी खास माहिती सांगणार आहोत.

मालिकेत माऊचा ऑनस्क्रीन भाऊ रोहन पाटीललाही चांगलीच पसंती मिळत आहे.रोहन ही भूमिका साकारली आहे अभिनेता सृजन देशपांडेने.आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्याने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. पण तुम्हाला माहिती आहे का? रोहन म्हणजेच सृजन हा प्रसिद्ध अभिनेते राजेश देशपांडे यांचा मुलगा आहे.

 

राजेश देशपांडे यांनी 'पुढचं पाऊल' 'कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक', 'करून गेलो गाव' ,'हिमालयाची सावली', 'धुडगूस' , 'धनंजय माने इथेच राहतात' अशा अनेक कलाकृतींचे अभिनय तसेच दिग्दर्शन त्यांनीच केले आहे. 

वडिलांप्रमाणे त्यानेही अभिनयक्षेत्रात एंट्री करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासूनच सृजनला अभिनयाची आवड होती.लहानपणाची त्याला अभिनयाचे धडे घरातूनच मिळयाला सुरुवात झाली होती. नाटुकली, एकांकीका, नृत्य अशा स्पर्धांमध्ये तो नेहमीच सहभाग घ्यायचा.

 

तिथूनच त्याच्या अभिनयाला खरी सुरुवात झाली आणि अभिनेता म्हणून तो घडत गेला.आज सृजननेही अभिनयाच्या कौशल्यावर स्वतःला सिद्ध केले आहे.सृजन सोशल मीडियारही सक्रीय असतो.सेटवरचे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियावरही त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.