Join us  

 -अन् अदिती सारंगधरच्या कावळ्यासोबत रंगल्या गप्पा..., हा मजेशीर व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 5:41 PM

Aditi Sarangdhar : अदिती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरत नाहीये.

अनेक मालिका, नाटक, चित्रपटांतून सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे अदिती सारंगधर (Aditi  Sarangdhar).  येऊ कशी तशी मी नांदायला, नवे लक्ष या मालिकेत तुम्ही तिला बघितलंच. अदिती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरत नाहीये. होय, या व्हिडीओ अदिती चक्क खिडकीत आलेल्या एका कावळ्यासोबत गप्पा मारताना दिसतेय. सकाळच्या गप्पा..., असं कॅप्शन देत तिने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.‘ काय काव काव करतोस. एवढी तुला चांगला फ्रेश बनवलेली इडली दिली. तुला इडली नको आहे आणि शाना आहेस तू मोठा. मी दिलेलं खात नाही. पण आरिनने दिलेलं बिस्कीट बरं खातोस. आता तो शाळेत गेला. आता त्याला शाळेतून बोलवू का? ओरडत नाहीये मी... तुला प्रेमाने सांगत आहे. काय देऊ तुला? फिश पाहिजे का? हो काय होय.... असं अदिती कावळ्याला म्हणतेय.

अदितीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हे फक्त तूच करू शकतेस, असं एका युजरने लिहिलं आहे. भारी आहे काव काव संभाषण..., असं एका युजरने लिहिलं आहे.

आपल्या अभिनयाने अदितीने टीव्ही, मालिका, आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये ठसा उमटवला आहे. रुईया कॉलेजमध्ये असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत गाजलेल्या मंजुळा या एकांकिकेपासून अदितीने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. एकांकिकेतून व्यावसायिक रंगभूमीवर तिने पाऊल ठेवलं. याशिवाय छोट्या पडद्यावरील  दामिनी, वादळवाट अशा मालिकांमधून ती घराघरात पोहचली.  नाथा पुरे आता  या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत तिने पाऊल ठेवलं. यानंतर विविध सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. प्रपोजल  हे नाटक अदितीच्या कारकिदीर्तील मैलाचं दगड ठरलं. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार