Join us  

Video: ओळखा पाहू किल्ला कोणता?; प्राजक्ताने दिलं नेटकऱ्यांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 6:25 PM

Prajakta Gaikwad: यावेळी तिने पुण्याजवळील एका गडाला भेट दिली असून हा किल्ला कोणता ते ओळखा असं म्हणत नेटकऱ्यांना प्रश्न विचारला. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने कमेंटचा पाऊस पाडला आहे.

'स्वराज रक्षक संभाजी', 'आई माझी काळूबाई' अशा कितीतरी मालिकांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad). उत्तम अभिनयासह स्वभावातील साधेपणा यामुळे प्राजक्ता कायम प्रेक्षकांचं मन जिंकत असते. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. सध्या प्राजक्ता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येत आहे.

सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता कायम प्रयत्न करत असते. यात कधी तिच्याविषयीचे अपडेट्स ती देते. तर काही वेळा ती चाहत्यांशी थेट संवाद साधते. यावेळी तिने पुण्याजवळील एका गडाला भेट दिली असून हा किल्ला कोणता ते ओळखा असं म्हणत नेटकऱ्यांना प्रश्न विचारला. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने कमेंटचा पाऊस पाडला आहे.

"पुण्यापासून अगदी जवळ असलेला... सह्याद्रीच्या भुलेश्वर रांगेवर असणारा... गिरीदुर्ग... अमृतेश्वर मंदिर, राजाराम महाराजांचे स्मारक त्याचप्रमाणे अनेक ऐतिहासिक स्थळे या किल्ल्यावर पाहायला मिळतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे.... पडणाऱ्या पावसात... धुक्यामध्ये.... पिठलं-भाकरी, गरम गरम कांदा भजी, ठेचा ,चटणी यांसारखे चविष्ट पदार्थ खायला मिळतात.  ओळखा पाहू किल्ला कोणता ?  (जास्त #hint दिली तर लगेच कळेल...)", असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती साध्या सिंपल लूकमध्ये दिसून येत आहे. तिच्यातील हाच साधेपणा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'स्वराज रक्षक संभाजी', 'आई माझी काळूबाई' अशा बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडसेलिब्रिटीटेलिव्हिजन