Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि..'; चाहत्यांसाठी तेजश्री प्रधानची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 08:53 IST

Tejashri pradhan: तेजश्रीने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.

'होणार सून मी या घरची' या गाजलेल्या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. या मालिकेत साध्या, सोज्वळ सुनेची भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे या मालिकेनंतर ती 'अग्गंबाई सूनबाई', 'जजमेंट', 'ती सध्या काय करते', 'झेंडा' अशा कितीतरी मालिका, सिनेमांमध्ये झळकले. परंतु, त्यानंतर जवळपास अडीच वर्ष ती टेलिव्हिजनपासून दूर होती. मात्र, अलिकडेच प्रेमाची गोष्ट या मालिकेतून तिने पुन्हा टीव्ही मालिकेत काम करायला सुरुवात केली आहे. ही मालिका सुरु झाल्यानंतर तिने चाहत्यांसाठी एक पोस्ट लिहिली.

तेजश्रीला छोट्या पडद्यावर पाहायला चाहते प्रचंड उत्सुक होते. त्यामुळे ही मालिका सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.प्रेक्षकांकडून मिळत असलेली ही दाद पाहून तेजश्री भारावून गेली आहे. त्यामुळेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

काय आहे तेजश्रीची पोस्ट?

"कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू?

तब्बल अडीच वर्षानंतर television वर पुन्हा परतल्ये..तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि पटकन म्हणतं “आम्हाला तू आमच्या घरातलीचं वाटतेस tv मधे पाहिल्यावर” …तेचं आपलं घरातलं माणूस अडीचं वर्षानंतर परत यावं , आपण त्याच्या गेल्या दिवसापासून परत येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून रहावं, आणि घरी परतलेल्या “त्या” माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे पाहून भरूनचं यावं….तसचं काहीस माझ्या मनाचं झालयं , आज पहिल्या भागाला (episode ला) तुम्ही दिलेला प्रतिसाद कळल्यानंतर इतकी वर्ष कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले.. पडले, धडपडले, पुन्हा उठले .. आधाराला फक्त काम होतं… शाश्वत फक्त काम होतं , इतकी वर्ष त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही.आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं… सांगावसं वाटलं ,

“मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या ‘त्या’ अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता, जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या ‘त्या’ अश्रुच्या थेंबाची.. जो कधी लक्ष्मी सीठी, कधी जान्हवी साठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्ता साठी ढळतो.. “ आणि हिचं जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे , या पुढे ही देत राहील पुन्हा एकदा … मनापासून आभार असेचं कायम माझ्या पाठीशी रहा. बाकी #HappyLife आहेचं", असं तेजश्रीने तिच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. मुक्ता असं तिच्या भूमिकेचं नाव असून तिच्यासोबत अभिनेता राज हंचनाळे हा स्क्रीन शेअर करत आहे. यापूर्वी राजने तुझ्यात जीव रंगला आणि जिवाची होतिया काहिली या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :तेजश्री प्रधान टेलिव्हिजनसेलिब्रिटी