Join us  

सुप्रिया पाठारेच्या लेकाने सुरु केलं नवं हॉटेल; पाहा त्याच्या ‘मharaj’ची Inside झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 2:40 PM

Supriya pathare son:सुप्रियाच्या लेकाने फूड ट्रक सुरु करत फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने आता स्वत: चं हॉटेल सुरु केलं आहे.

कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. मराठी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या सुप्रियाचा लेक सध्या चर्चेत येत आहे. आईसारखंच अभिनय क्षेत्रात न येता तिच्या लेकाने करिअरची वेगळी वाट निवडली. काही महिन्यांपूर्वी सुप्रियाच्या लेकाने फूड ट्रक सुरु करत फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने आता स्वत: चं हॉटेल सुरु केलं आहे.

सुप्रियाने सोशल मीडियावर काही व्हिडीओ पोस्ट करत तिच्या लेकाच्या नव्या बिझनेसची माहिती चाहत्यांना दिली. तसंच हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले. या उद्घाटन सोहळ्यासाठी मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

सुप्रियाच्या लेकाचं नाव मिहीर पाठारे असं असून तो प्रोफेशनल शेफ आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने विदेशात लोकप्रिय असलेली फूड ट्रक ही संकल्पना ठाण्यात सुरु केली.  ‘मharaj’ असं त्याच्या फूड ट्रकचं नाव होतं. त्यानंतर आता त्याने याच नावाने ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूट कॉर्नर हे नवीन हॉटेल सुरु केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी