Join us

गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' मालिकेत दिसली असती स्मिता शेवाळे, पण...; नेमकं कुठं बिनसलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:05 IST

गाजलेल्या 'पवित्र रिश्ता'मालिकेत दिसली असती स्मिता शेवाळे, पण...; 'तो' किस्सा सांगत म्हणाली...

Smita Shewale: हिंदी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या मालिकांच्या यादीत 'पवित्र रिश्ता' हे नाव आजही आवर्जून घेतलं जातं. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. मालिकेतील मानव-अर्चनाची जोडी हिट ठरली.यात सुशांत सिंग राजपूतने मानवची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे अर्चना साकारुन प्रेक्षकांच्या मनात घर केलं. दरम्यान, या लोकप्रिय मालिकेत अंकिता-सुशांतसह उषा नाडकर्णी, सविता प्रभूणे, प्रिया मराठे तसंच प्रार्थना बेहरे असे कलाकार देखील होते. 

'पवित्र रिश्ता'च्या पहिल्या भागाप्रमाणे त्याचा दुसऱ्या भागाचीही चांगली चर्चा झाली होती. परंतु, तुम्हाला माहितीये या मालिकेच्या दुसऱ्या भागासाठी अंकिता लोखंडेच्या ऐवजी मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळेला विचारणा करण्यात आली होती. स्वत स्मिता शेवाळेने याबाबत खुलासा केला आहे.नुकतीच अभिनेत्रीने राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यादरम्यान, तिने हिंदी ऑडिशनचा किस्सा सांगितला. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली,"हिंदीमध्ये काम करण्यासाठी मी काही ऑडिशन्स दिल्या होत्या. मी कलर्सवरती एक मालिका केली त्यानंतर आणखी एका हिंदी मालिकेसाठी सिलेक्शन झालं होतं. पण तारखा जुळत नसल्यामुळे ती मालिकाही सोडावी लागली."

त्यानंतर पुढे अभिनेत्रीने सांगितलं,"पवित्र रिश्ताचा जो दुसरा भाग होता. जेव्हा अंकिता त्यासाठी नाही म्हणाली होती , त्यादरम्यान, मी ऑडिशन दिली होती. ती सगळी प्रोसेस झाली होती पण त्याचं पुढे काही झालं नाही."असा किस्सा अभिनेत्रीने स्मिता शेवाळेने केला. 

रिजेक्शबाबत स्मिता शेवाळे काय म्हणाली...

रिजेक्शनबद्दल बोलताना स्मिता शेवाळे म्हणाली, "जाहिरातींच्या बाबतीत मला कायम असं वाटायचं की अरे मी यासाठी मनापासून ऑडिशन दिलं आहे. मला असं वाटायचं यासाठी मी परफेक्ट दिसेन. पण, शॉर्टलिस्टेड होऊनही त्याचं  पुढे काही घडलंच नाही. पवित्र रिश्ताचं सांगायचं झाल तर नंतर अंकितालाच फायनल करण्यात आलं."

टॅग्स :टेलिव्हिजनअंकिता लोखंडेसेलिब्रिटी