Vallari Viraj Video: 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज नावारुपाला आली. मालिकेत जहागीरदारांची सून लीलाची भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. दरम्यान, या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते. विविध डान्स व्हिडीओ घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. व्हिडीओमधील अभिनेत्रीचे हावभाव, डान्स स्टेप्स अनेकांचं लक्ष वेधून घेतात. अशातच नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा नवा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय.
वल्लरी विराजच्या डान्सची फक्त तिच्या चाहत्यांनाच नाहीतर कलाकारांनाही भुरळ पडते. नुकताच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर 'मैं अलबेली' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील अभिनेत्रीचा डान्स पाहून सगळ्यांनीच तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. फायनल व्हिडीओपेक्षा प्रॅक्टिसिंग व्हिडीओ सर्वात जास्त आवडला..., असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "एक्सप्रेशन्स क्वीन", "खूपच सुंदर...", अशा कमेंट्स करत चाहत्यांनी वल्लरीचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लीला साकारुन वल्लरी विराजच्या चाहतावर्ग प्रचंड वाढला आहे. आता ही मालिका संपल्यानंतर वल्लरी कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.