Join us  

Video: मधुराणी अन् तिच्या लेकीमध्ये रंगली गाण्याची जुगलबंदी; अरुंधतीच्या मुलीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 8:05 PM

Madhurani gokhale-prabhulkar: अलिकडेच मधुराणीने तिच्या रिअल लाइफ लेकीसोबत एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). या मालिकेत मधुराणीने अरुंधती ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं आहे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मधुराणीचा आज तुफान मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम प्रयत्न करत असते. अलिकडेच मधुराणीने तिच्या रिअल लाइफ लेकीसोबत एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी अनेकदा तिच्या लेकीसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीदेखील तिने तिच्या मुलीसोबत असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मधुराणी आणि तिच्या लेकीमध्ये गाण्याची जुगलबंदी सुरु असल्याचं दिसून येत आहे.

आई कुठे काय करते : अरुंधतीच्या रिअल लाइफ मुलीविषयी माहितीये का? पाहा तिचे फोटो

या व्हिडीओमध्ये मधुराणी आणि तिची लेक स्वराली बडे अच्छे लगते हैं....!! हे गाणं गातांना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमधून मायलेकींचं प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. 

दरम्यान, मधुराणी बऱ्याचवेळा स्वरालीचे व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच मधुराणीची एक मुलाखत चर्चेत आली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लेकीविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. यात तिच्या लेकीचं नाव ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ठेवल्याचं म्हटलं होतं. 'सुंदर माझं घर' या चित्रपटात मधुराणीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सोबतच तिने संगीत दिग्दर्शनही केलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाणी दिलीप प्रभावळकर यांना विशेष आवडली त्यामुळे ते सेटवर मधुराणीला स्वराली म्हणायचे. इतकंच नाही तर तुम्हाला मुलगी झाल्यावर तिचं नाव स्वराली ठेवा असंही त्यांनी मधुराणीला सांगितलं होतं.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकासेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन