२०२४ ला निरोप देत नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं गेलं. या नवीन वर्षात सेलिब्रिटींनीही अनेक नवे संकल्प केले आहेत. प्रत्येकालाच नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या गोष्टीने करायची असते. मराठी अभिनेत्रीने २०२५ ची सुरुवात वैष्णो देवीच्या दर्शनाने केली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्रीने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं. याचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेत्री काजल काटेने नववर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीर गाठलं आहे. वैष्णो देवीच्या दर्शनाने काजलने २०२५ या नववर्षाची भक्तिमय सुरुवात केली. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. "नवीन वर्ष, नवीन स्वप्न, नवीन सुरुवात...जय माता दी", असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे. कालज तिच्या मैत्रिणीसोबत जम्मू काश्मीरला वैष्णो देवीच्या दर्शनाला गेली होती.
काजलने मराठी मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. 'मुरांबा' मालिकेतही काजल महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 'तू म्हणशील तसं' या नाटकातही तिने काम केलं आहे. काजल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती करिअर आणि वैयक्तिक लाइफचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.