Join us  

हेमांगी कवीला लॉटरी लागली! अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 1:51 PM

हेमांगीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे. 

हेमांगी कवी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सर्वच माध्यमांमध्ये हेमांगीने काम केलं आहे. दमदार भूमिका साकारून हेमांगीने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. तिने साकारलेल्या अनेक भूमिका चाहत्यांना भावल्या. आता हेमांगीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. हेमांगीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे. 

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हिंदी मालिकेच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. 'कैसे मुझे तुम मिल गयी' या हिंदी मालिकेत हेमांगी झळकणार आहे. झी टीव्हीवरील या मालिकेत हेमांगी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सृष्टी झाबरोबर हेमांगी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ही पोस्ट शेअर करत हेमांगीने "चिटणीस फॅमिलीला भेटा... कैसे मुझे तुम मिल गयी", असं म्हटलं आहे. हेमांगीची ही मालिका २७ नोव्हेंबरपासून रात्री १० वाजता झी टीव्हीवर पाहता येणार आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

याआधी हेमांगी 'तेरी लाडली मै' या हिंदी मालिकेत महत्तवपूर्ण भूमिकेत दिसली होती. तिने 'अवघाचि संसार', 'मन धागा धागा जोडते नवा', 'वादळवाट', 'लेक माझी दुर्गा', 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ताली या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती. क्रिकेटर युवराज सिंह आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जाहिरातीत स्क्रीन शेअर केल्यामुळे हेमांगी चर्चेत आली होती. 

टॅग्स :हेमांगी कवीमराठी अभिनेताटिव्ही कलाकार