Join us

"लोकांना वाटलं मी इंडस्ट्री सोडली...",'त्या' अफवांबद्दल मयुरी वाघने सोडलं मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:28 IST

"आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या...", स्वत: बद्दलच्या 'त्या' अफवांबद्दल मयुरी वाघने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

Mayuri Wagh: शांत व मनमिळावू स्वभाव, आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं  मन जिंकून घेणारी नायिका म्हणजे मयुरी वाघ. अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमधून अभिनय करत तिने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अस्मिता या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेमुळे आजही तिला ओळखलं जातं. अलिकडेच ती स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेत पाहायला मिळाली.मात्र, मागील काही वर्षांपासून अभिनेत्री  इंडस्ट्रीपासून दुरावली होती. सोशल मीडियावरही ती फारशी सक्रिय नसायची. त्यामुळे तिने इंडस्ट्रीला कायमचा रामराम केला, अशा अफवा पसरल्या होत्या. त्यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतीच मयुरी वाघने सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यादरम्यान, मयुरी त्या अफवांचं खंडण करत म्हणाली, "आज १०-१२ वर्षानंतर लोकं मला अस्मिता म्हणून ओळखतात. एकप्रकारे हे चांगलंच आहे पण लोकांच्या मनात ते पात्र खोलंवर रुजलं आहे. त्यामुळे मला माझी ही जबाबदारी वाटते की त्या पद्धतीचं, अस्मिता इतकंच उत्तम पात्र साकारायला मिळावं. तेवढं उत्तम काहीतरी करावं. कारण, लोकांना असं वाटू नये की अरे! हिने इतकं चांगलं काम केलं मग ही हे काम का करतेय? त्यामुळे मी काही प्रोजेक्ट्स नाकारले."

मग पुढे ती म्हणाली,"नंतर लोकांना असं वाटायला लागलं की मी इंडस्ट्री सोडली आहे. मला नाहीत माहित की हे सगळं कुठून आलं? कोणी पसरवलं? कारण, मधल्या काळात आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे सोशल मीडिया, इंडस्ट्रीपासून थोडी दुरावले. तिथं जाणं मी टाळत होते कारण मला स्वत: साठी वेळ पाहिजे होता. यामुळे लोकांना असं वाटलं की ही कोणतंही काम करत नाही आहे. त्याचदरम्यान मी माझा कॉन्टॅक्ट नंबर बदलला. त्यामुळे हिने इंडस्ट्री सोडली असं काहींना खरोखर वाटत होतं. या कारणामुळे खूप कमी प्रोजेक्ट्स माझ्यापर्यंत आले. गेल्या दोन वर्षांमध्ये मला काही प्रोजेक्ट्साठी विचारणा करण्यात आली. पण, काही कारणांमुळे माझ्यापर्यंत आलेलं काम पुढे सरकलं नाही. त्यानंतर कोविड आला आणि खूप मोठा गॅप झाला." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला.

वर्कफ्रंट

मयुरी वाघच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'अस्मिता','आई एकविरा', 'वचन दिले तू मला', 'मेजवाणी' आणि 'सुगरण' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने बालकलाकार म्हणून 'उठी उठी गोपाळा' नाटकात काम केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mayuri Wagh clarifies rumors about leaving the entertainment industry.

Web Summary : Mayuri Wagh addressed rumors of quitting acting, explaining her absence was due to personal reasons and a desire for meaningful roles. She denied permanently leaving the industry, citing project delays and COVID-19 as contributing factors.
टॅग्स :मयुरी वाघटिव्ही कलाकार