Join us

Navratri 2021: 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीने केलं देवीच्या रुपात फोटोशूट; तुम्ही ओळखलं का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:54 IST

Navratri 2021: अलिकडेच 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील एका अभिनेत्रीने देवीचं रुप धारण करुन खास फोटोशूट केलं आहे.

ठळक मुद्देअपूर्वाप्रमाणेच दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडितही देवीच्या रुपात हटके फोटोशूट करत असते.

शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं, मांगल्याचं, प्रसन्नतेचं वातावरण पसरलं आहे. अनेकांच्या घरी देवीचे घट स्थापन झाले असून मोठ्या उत्साहात पुजाआर्चा करण्यात येत आहे. यामध्येच सेलिब्रिटींमध्येही यंदा नवरात्रौत्सवाचा (navratri) सुरुवात उत्साह दिसून येत आहे. अनेक अभिनेत्रींनी पिवळ्या रंगाच्या साड्या, ड्रेस परिधान करुन त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, या सगळ्या कलाकारांमध्ये रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

काही तासांपूर्वीच रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एका अभिनेत्रीने देवीचं रुप धारण करुन खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिने केलेल्या या रुपामुळे अनेकांना तिला ओळखणंही कठीण झाल्याचं पाहायला मिळालं.

'रात्रीस खेळ चाले 'या मालिकेत शेवंता ही भूमिका साकारून विशेष लोकप्रिय झालेल्या अपूर्वा नेमळेकरने देवीच्या रुपात हे फोटोशूट केलं आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रुप धारण करुन तिने हे फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये अपूर्वाने मळवट भरला असून देवीप्रमाणेच ती छान अलंकारांनी सजली आहे. त्यामुळे तिचं हे रुप अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

'नवरात्रीचा पहिला दिवस, रंग- पिवळा, देवी महालक्ष्मी (अंबाबाई). कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखली जाते. मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!', अशी कॅप्शन अपूर्वाने या फोटोला दिली आहे.

दरम्यान, अपूर्वाप्रमाणेच दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडितही देवीच्या रुपात हटके फोटोशूट करत असते. २०२० मध्ये तेजस्विनीने कोविड योद्ध्यांचे आभार मानण्यासाठी एक फोटोशूट केलं होतं. तसंच देवी प्रत्येक पावलावर आपल्यासोबत कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न तिने या फोटोशूटमधून केला होता. 

टॅग्स :नवरात्रीअपूर्वा नेमळेकरसेलिब्रिटी