गौरी प्रधान
जरा हेच पहा... 'कुटुंब', 'क्योंकी सास भी कभी बहूँ थी ', 'कुमकुम'सारख्या अनेक मालिका गाजवणारी ही गौरी प्रधान... मराठमोळ्या गौरीचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला...
अंकिता लोखंडे
आजही रसिक छोट्या पडद्यावरची अर्चनाला विसरलेले नाहीत.अर्चना हे नाव आजही घराघरात प्रत्येकांच्या तोंडावर सहज येतं.. हेच नाव आपल्या भूमिकेतून प्रसिद्ध करणारी ही तनुजा अर्थात अंकिता लोखंडे.. 'पवित्र रिश्ता'मधला तिचा अभिनय सा-यांना असा काही भावला की ती मराठमोळी मुलगी आहे याचा कुणालाच विश्वास बसला नाही...
माधवी गोगटे
मिसेस तेंडुलकर, बसेरा, कहीं तो होगा, कोई अपना सा सारख्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी माधवी गोगटेसुद्धा मराठमोळीच....
प्रिया मराठे
कसम से, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते है, साथ निभाना साथियाँ या मालिकांमधून प्रिया मराठे या मराठी मुलीनं रसिकांची मनं जिंकलीत...
मानसी साळवी
कोई अपना सा, सारथी, सती, मिठा मिठा प्यारा प्यारा सारख्या एकाहून सरस आणि दमदार मालिकांमधल्या भूमिकेने मानसी साळवी या मराठी नायिकेनं रसिकांच्या मनावर गारुड घातलंय...
क्षिती जोगसुद्धा
घर की लक्ष्मी बेटियॉं, आप की अंतरा, साराभाई वर्सेस साराभाई, नाव्या मधली ही क्षिती तर तुम्हाला चांगलीच माहिती... हीच क्षिती जोगसुद्धा मराठमोळी...सध्या ती ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.
पल्लवी सुभाष
गोद भराई, बसेरा, आठवा वचन, तुम्हारी दिशा सारख्या मालिकांमधून पल्लवी सुभाष हे मराठी नावही घराघरात गाजतंय...
राजश्री ठाकूर
सात फेरे आणि भारत का वीर पुत्र महाराणा प्रतापमधली राजश्री ठाकूरसुद्धा मराठमोळी नायिकाच...एकूणच काय तर हिंदीतला छोटा पडदा मराठमोळ्या नायिकांनी व्यापून टाकलाय... हिंदीतल्या एका प्रसिद्ध गाण्यांच्या ओळींप्रमाणे... ये मराठी कूडियों का है जमाना......