Join us

World cup ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या खेळाडूला पाहून मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, 'दहशतवाद...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 17:54 IST

ऑस्ट्रेलियन खेळाडू मिशेल मार्शच्या या कृतीवर मराठी अभिनेत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

ऑस्ट्रेलियाने World cup नावावर केलं आणि असंख्य भारतीयाचं हृदय तुटलं. सलग सर्व मॅच जिंकणारे भारतीय खेळाडू अंतिम सामन्यातच हरले. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सहाव्यांदा विश्वचषक नावावर करत जल्लोष साजरा केला. दरम्यान मिशेल मार्श या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा एक फोटो व्हायरल झाला ज्यावर प्रचंड टीका होत आहे. त्याने चक्क ट्रॉफीवर पाय ठेवून फोटो काढला असल्याने अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला. मार्शच्या या कृतीवर मराठी अभिनेत्यानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या सध्या गाजत असलेल्या मालिकेत अधिपतीच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar) यांनी मिशेल मार्शचा तो फोटो पोस्ट करत संतापलेल्या स्वरात कॅप्शन लिहिले आहे. 'आपल्यात पूर्वापार रुजलेले संस्कार, पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या प्रत्येकाने ग्राह्यच मानावेत.. त्यानुसारच जगावं..अन्यथा…याच हट्टाग्रहाने जगात दहशतवाद आणला असेल ना..?!' 

स्वप्नील राजशेखर यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 'थोडं थांबा कर्म हिशोब करणार' असं एकाने म्हटलं आहे. स्वप्नील राजशेखर हे अभिनयाशिवाय लेखक, दिग्दर्शकही आहेत. 'कट्यार काळजात घुसली','बाईपण भारी देवा','टकाटक 2' या मराठी सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतावन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियाटिव्ही कलाकार