Join us

मुलीच्या शाळेत मराठमोळ्या अभिनेत्याचा डान्स; बापलेकीच्या नात्याचा डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:08 IST

पप्पू कॅन डान्स साला! लेकीबरोबर मराठी अभिनेत्याचा डान्स, व्हिडिओ व्हायरल

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे समीर परांजपे. या मालिकेत अभिमन्यू हे पात्र साकारून समीरने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. समीर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही तो चाहत्यांना माहिती देत असतो. सध्या समीरच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

समीरने नुकतंच त्याच्या लेकीच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाला डान्स केला. याचा व्हिडिओ त्याच्या पत्नीने शेअर केला आहे. या व्हिडिओत समीर स्टेजवर लेकीबरोबर 'मै अगर कहू' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. समीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. बापलेकीच्या डान्सचा हा व्हिडिओ पाहून चाहते कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्याचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत समीरची पत्नी म्हणते, "पप्पू कॅन डान्स साला! समीरला डान्स करायला लावायला फायनली कोणीतरी भेटलं." 

दरम्यान, समीर 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' या कार्यक्रमातही सहभागी झाला होता. त्याने 'गोठ' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर 'क्लास ऑफ ८३' या हिंदी सिनेमातही तो झळकला होता. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता