Join us  

"या वर्षात काही माणसं कायमची निघून गेली...", कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:35 AM

कुशलने २०२३ वर्षाबाबत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने २०२३ चा अनुभव शेअर केला आहे.

कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'चला हवा येऊ द्या' शोमधून घराघरात पोहोचलेला हा अभिनेता त्याच्या कुशल विनोदीबुद्धीने प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबाबत कुशल पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असतो. त्याबरोबर वैयक्तिक जीवनातील अनेक अपडेट्सही तो शेअर करत असतो. 

नुकतंच कुशलने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. कुशलने २०२३ वर्षाबाबत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने २०२३ चा अनुभव शेअर केला आहे. "ह्या सरत्या वर्षाने जाताना बऱ्याच गोष्टी सोबत नेल्या. काही माणसं मनात घरं करुन कायमची निघून गेली, त्या रिकाम्या घरांच्या जागा आता कधीच भरुन काढता येणार नाहीत," असं म्हणत कुशलने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

पुढे कुशल म्हणतो, "दरवर्षीप्रमाणे हे वर्ष सुद्धा “व्याजाचा हप्ता” जावा तसा माझ्यातला थोडा  “innocence” घेऊन गेलंच. मी invest केलेल्या “FD” प्रमाणेच माझ्यातही “maturity” आली नाही, ती नाहीच! बहुतेक कुठे “invest करावं” आणि कुठे “invest व्हावं” हे मला खरंच कळत नाही. मित्रांनी सांगितलंय नवीन वर्षात जाताना कोणत्याच emotionsचं baggage सोबत घेऊन जाऊ नकोस, म्हणून माझ्यातल्या मलाच थोडा मागे ठेऊन निघालोय . बाकी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. येत्या वर्षात व्याज थोडं कमी लागू दे. “investment”ला  “maturity” येऊ दे आणि मनातली रिकामी घरं भाडेतत्वावर का होईना, पण जाऊदेत. मनाच्या उंबरठ्यावर पावलांची ये जा रहायला हवी."

कुशलच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. सरत्या वर्षात कुशलने केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेटिव्ही कलाकारमराठी अभिनेताचला हवा येऊ द्या