मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथील ट्रॅफीक आणि सुसाट रिक्षा चालवणारे रिक्षाचालक यांच्याविषयी ठावूकच आहे. बऱ्याचदा मुंबईचे रिक्षावाले जादा प्रवाशी घेतल्यामुळे,अवाजवी दर आकारल्यामुळे तर काही वेळा योग्यरित्या रिक्षा न चालवल्यामुळे चर्चेत येत असतात. अशाच एका रिक्षा चालकाचा भन्नाट अनुभव एका मराठमोळ्या अभिनेत्याला आला आहे. या अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याविषयी भाष्य केलं आहे.
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील दौलत अर्थात अभिनेता ऋषिकेश शेलार याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ऋषिकेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टसोबतच त्याने रिक्षावाला सध्या कशाप्रकारे रिक्षा चालवतोय याविषयी सांगितलं आहे.
'जवळजवळ हॅलिकॉप्टरमध्ये बसल्याचा फील देतात आमच्या इथले रिक्षावाले', असं कॅप्शन देत ऋषिकेशने हा फोटो शेअर केला आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत येत आहे. ऋषिकेश मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या 'तो तुला शिकवीन चांगला धडा' या मालिकेत अधिपती ही भूमिका साकारत आहे. अलिकडेच त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचं थाटात बारसं पार पडलं असून रुही असं तिचं नाव ठेवण्यात आलं आहे.