Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांच्या घरी जाऊन विचारलं काही खायला आहे का?" अंशुमन विचारेने सांगितलेला प्रसंग वाचून तुम्हीही व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:49 IST

"नाटकाचा कॉन्ट्रॅक्टर पळून गेला आणि...", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' प्रसंग

Anshuman Vichare: आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे (Anshuman Vichare). 'फू बाई फ', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' अशा कार्यक्रमांमधून त्याने प्रेक्षकंच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या अभिनेता एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. 

नुकतीच अंशुमन विचारेने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने 'टूरटूर' नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला,"आमचा श्रीवर्धनला नाटकाचा प्रयोग होता. तो एक कॉन्ट्रॅक्ट शो होता आणि पहिलाच शो होता. आम्ही जाताना म्हटलं पैसे खर्च करूयात. आमच्याकडे पन्नास एक रुपये होते. तेव्हा पैसे जास्त लागायचे नाहीत. आम्ही खर्च केले. आणि तिकडे कॉन्ट्रॅक्टर पळून गेला. शोचं तिकीट, सगळी लफडी झाली. आमच्याकडे पैसे नव्हते, मग करायचं काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. 

पुढे अभिनेता म्हणाला, "तेव्हा आम्ही लोकांच्या घरात गेलो, त्यांना सांगितलं आमचं नाटक आहे, तुम्ही या. आणि काही खायला आहे का? काही खायला आहे का? असं म्हटलंय मी. मी त्यांना म्हटलं, भूक लागलीये. आम्ही जेवलो त्यांच्याकडे, त्यांना नाटकाला बोलावलं आणि मग आम्ही आलो. ही १९९५ ची गोष्ट आहे. असेही प्रकार आमच्यासोबत घडले आहेत." 

टॅग्स :अंशुमन विचारेमराठी अभिनेतासेलिब्रिटी