अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. तिचे काका उपेंद्र दाते हे रंगभूमीवर प्रचंड प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली आहे. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
अनिताचे लग्न चिन्मय केळकरसोबत झाले असून चिन्मय देखील याच क्षेत्राशी संबंधित आहे. तो अनेक वर्षांपासून अनुराग कश्यपसोबत काम करत असून तो एक लेखक आहे. ललित केंद्रात असतानाच चिन्मय आणि अनिताची ओळख झाली होती. पण त्यावेळी केवळ ते फ्रेंड्स होते. पण एका नाटकाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सिगारेट्स या नाटकाच्या तालमीच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याची त्यांना जाणीव झाली. पण चिन्मयला लग्न करायचे नव्हते आणि त्याने ही गोष्ट स्पष्टपणे अनिताला सांगितली होती. त्यामुळे त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली. दीड वर्षं ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असे. पण त्यानंतर त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. आता त्यांच्या लग्नाला अकरा वर्षांहून अधिक काळ झालेला आहे.
Also Read : फोटोत दिसणारी कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री,जिचा लूक ठरतोय लक्षवेधी