Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन धागा धागा जोडते नवा'मधील आनंदीच्या गुलाबी साडीतल्या बोल्ड अदा, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 16:49 IST

Divya Pugaonkar : अभिनेत्री दिव्या पुगावकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे.

'मुलगी झाली हो' मालिकेतून माऊच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) घराघरात पोहचली. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. सध्या ती मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत पाहायला मिळते आहे. ती या मालिकेत आनंदीची भूमिका साकारते आहे. तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दरम्यान आता दिव्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे.

अभिनेत्री दिव्या पुगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर गुलाबी साडीतला व्हिडीओ शेअर केले आहेत. यात तिने गुलाबी रंगाच्या साडीवर वन शोल्डर डार्क गुलाबी ब्लाउज परिधान केला आहे. तिने हलका मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत. लूक पूर्ण करण्यासाठी हातात तिने गुलाबी रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. या व्हिडीओत ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. यातील तिच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. 

वर्कफ्रंटदिव्या पुगावकर हिने 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेआधी  मुलगी झाली हो, प्रेमा तुझा रंग कसा आणि विठुमाऊली या मालिकांमध्ये काम केले आहे. तिला पहिल्यांदाच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आहे. या मालिकेतील माऊच्या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आता तिची मालिका 'मन धागा धागा जोडते नवा'लादेखील प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.  

रिलेशनशीपमुळेही अभिनेत्री येते चर्चेतदिव्या प्रोफेशनल लाइफशिवाय लव्ह लाइफमुळेही चर्चेत येत असते. ती अक्षय घरत सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.