मनीषा राणी ही बिहारमधील एक लोकप्रिय सोशल मीडिया स्टार, डान्सर आणि अभिनेत्री आहे. जिने 'बिग बॉस ओटीटी २' आणि 'झलक दिखला जा ११'द्वारे हिंदी मनोरंजनसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. मनीषा रानी कायम चर्चेत असते, ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतंच मनीषा रानी हिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
मनीषा रानीनं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी मुंबईत स्वतःच्या आलिशान घरात गृहप्रवेश केलाय. पूर्ण विधी आणि परंपरेनुसार तिनं आपल्या नवीन घरात पाऊल ठेवले. यावेळी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. नवीन घराचे फोटो शेअर करताना मनीषाने अत्यंत भावूक कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले, "माझ्या नवीन घरात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धीचे स्वागत आहे". चाहत्यांसोबतच गौहर खान, श्रुतिका अर्जुन, अर्चना गौतम आणि विशाल सिंग यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
मनीषा राणीचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप खडतर होता. 'ईटाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत मनीषाने सांगितले की, तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला वडिलांकडून बिलकूल पाठिंबा मिळाला नव्हता. पण आपल्या हिंमतीवर पोट भरण्यासाठी तिला कधी वेटर म्हणून तर कधी बॅकग्राउंड डान्सर बनून पैसे कमवावे लागले. सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडीओ बनवून तिने लोकप्रियता मिळवली आणि 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये प्रवेश मिळवला, जो तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
Web Summary : Manisha Rani, a Bihar native, now owns a Mumbai home at 28. She gained fame via Bigg Boss OTT. Overcoming initial family disapproval, she worked various jobs. Celebrities congratulated her on her achievement.
Web Summary : बिहार की मनीषा रानी ने 28 साल की उम्र में मुंबई में घर ख़रीदा। 'बिग बॉस ओटीटी' से मिली पहचान। परिवार के विरोध के बावजूद, उन्होंने कई काम किए। सितारों ने दी बधाई।