Join us

​नकुशीत साजरी केली जाणार मंगळागौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 11:18 IST

श्रावण महिना असल्याने मंगळागौरचे कार्यक्रम आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नवीन लग्न झालेल्या प्रत्येक विवाहितेसाठी तर मंगळागौर हा ...

श्रावण महिना असल्याने मंगळागौरचे कार्यक्रम आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नवीन लग्न झालेल्या प्रत्येक विवाहितेसाठी तर मंगळागौर हा आनंदाचा सण असतो. पतीसाठीचे हे व्रत प्रत्येक स्त्री मनापासून करत असते. ‘नकुशी... तरीही हवीहवीशी’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. ‘नकुशी... तरीही हवीहवीशी’ या मालिकेची नायिका नकुशीचेदेखील काहीच महिन्यांपूर्वी रणजीतसोबत लग्न झाले आहे. त्यामुळे तिची देखील ही पहिलीच मंगळागौर आहे. मंगळागौरच्या या सणासाठी ती खूपच उत्सुक आहे. अतिशय उत्साहात तिची मंगळागौर साजरी केली जाणार आहे. मात्र ही पहिली मंगळागौर नकुशीच्या आयुष्यात काय घेऊन येणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. नकुशी या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून नकुशी आणि रणजीत यांच्यातले पती-पत्नीचे नाते आता छान फुलू लागले आहे. नकुशीकडे आता गोड बातमी देखील आहे. त्यामुळे या मंगळागौरला नकुशीच्या आयुष्यात काय घडतंय हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.नकुशी या मालिकेत प्रत्येक सण बग्गीवाला चाळीत अतिशय धामधुमीत साजरे केले जातात. त्यामुळे नकुशीच्या पहिली मंगळागौरीसाठी बग्गीवाला चाळीतही उत्साहाचे वातावरण आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून या मंगळागौरीमध्ये पारंपरिक खेळही खेळले जाणार आहेत. 'नकुशी' या मालिकेत नकुशीच्या भूमिकेत प्रसिद्धी आयलवार, रणजितच्या भूमिकेत उपेंद्र लिमये या लोकप्रिय जोडी सोबत  भानूमामीची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी साकारत आहेत.Also Read : ​उपेंद्र लिमयेचे शूटिंग चक्क तीन वेळा थांबवावे लागले...!