Join us
Daily Top 2Weekly Top 5

केसरी नंदन मानव गोहिल दिसणार 'या' भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 17:36 IST

केसरी नंदनमध्ये केसर नावाच्या एका तरूण मुलीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. ही भूमिका चाहत तेवानीने साकारत  आहे, तिचे स्वप्न आहे तिचे वडील हनुमंत यांनी कुस्तीपटू व्हावे.

ठळक मुद्देअभिनेता मानव गोहिल केसरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे

कलर्स लवकरच एका नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत वडील-मुलगी यांचे नाते, आईचे प्रेम आणि भावाने निरपेक्ष भावनेने बहिणीचे स्वप्न सत्यात येण्यासाठी केलेली मदत यावर भाष्य करण्यात येणार आहे. 

केसरी नंदनमध्ये केसर नावाच्या एका तरूण मुलीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. ही भूमिका चाहत तेवानीने साकारत  आहे, तिचे स्वप्न आहे तिचे वडील हनुमंत यांनी कुस्तीपटू व्हावे. केसर सर्व अडथळ्यांवर मात करणार आहे आणि जिंकण्यासाठी धैर्य दाखविणार आहे.

टेलिव्हिजन अभिनेता मानव गोहिल केसरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हनुमंत हे असे गृहस्थ आहेत जे स्त्रियांचा सन्मान करतात आणि त्यांच्या निवडीचा सुध्दा आदर करतात. आस्था चौधरी मानव गोहिल पत्नीची भूमिका साकारणार आहे. माधवी अतिशय परिपूर्ण स्त्री आहे. ती घरासाठी कर्तव्यनिष्ठ आहे आणि प्रामाणिक पत्नी आहे. ती केसरच्या प्रवासात महत्त्वची ठरणार आहे. 

मानव गोहिल म्हणाला, “सेट वरून घरी परत यायला खूप वेळ लागत होता आणि त्यामुळे वाहतूक कमी करण्यासाठी व्यावहारिक निर्णय घेतला जवळ रहायला जाण्याचा. मी माझा वेळ माझी स्क्रिप्ट वाचण्यात घालवतो आणि हनुमंताचे पात्र साकारण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते आहे.” मानव त्याच्या पात्राच्या भूमिकेत अचूक बसण्यासाठी अतिशय मेहनत घेताना दिसतो आहे. तसेच तो डाएट ही करतो आहे आणि कुस्तीची सर्व तंत्रे शिकण्याचा प्रयत्न करत आहे.