मलायका अरोरा बनणार रिअॅलिटी शोची जज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 17:21 IST
बॉलिवूड बोल्ड आणि ब्युटिफुल मलायका अरोरा लवकरच जजच्या खुर्जीत बसलेली दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मलायका एका मॉडलिंग रिअॅलिटी शोमध्ये ...
मलायका अरोरा बनणार रिअॅलिटी शोची जज
बॉलिवूड बोल्ड आणि ब्युटिफुल मलायका अरोरा लवकरच जजच्या खुर्जीत बसलेली दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मलायका एका मॉडलिंग रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल 3' च्या सीजनला ती जज करणार आहे. एका इंटरव्ह्यु दरम्यान मलायकाने सांगितले होते की, इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल सीजन 3 च्या पॅनलिस्टमध्ये माझा सहभाग आहे. ''या शोमध्ये आम्ही फक्त सुंदर चेहरा नाही तर इतर पैंलूचे सुद्धा परीक्षण करणार आहोत. पुढे ती म्हणाली ''फॅशन माझ्या मानाच्या नेहमीच जवळ असते.'' सेलिब्रेटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी पण या पॅनलचा भाग असणार आहे. याआधी मलायकाने नच बलिय हा रिअॅलिटी शोदेखील जज केला होता. 2010मध्ये झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सुद्धा जज बनली होती. ALSO READ : पाहा, ग्लॅमरस बर्थ डे गर्ल मलायका अरोराचा हॉट अवतार...!नुकताच झालेल्या करिना कपूर खानच्या डे पार्टीत मलायका आपल्या बोल्ड अंदाजात दिसली होती. पार्टीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या नजरा फक्त तिच्यावर खिळल्या होत्या. या पार्टीत तिने आपल्या हटक्या अंदाजात हजेरी लावली होती. मलायका 43 वर्षांची झाली आहे मात्र तिच्याकडे बघून तिच्या वयाचा अंदाज कोणाला लावता येणे शक्य नाही. मलायकाने मॉडलिंग, आयटम साँग करण्याबरोबरच दबंग आणि दबंग 2 या चित्रपटाची निमिर्ती देखील केली आहे. मात्र अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका दबंग 3 चित्रपटाची निर्माती असणार का हे बघण्यासाठी आपलाला थोडावेळ थांबावं लागेल. अरबाजसोबत असलेले 18 वर्षांचे नातं तुटल्यानंतर मलायका जास्त चर्चेत आली होती. मलायका आणि अरबाज बॉलिवूडमधल्या एक हॉट कपलपैकी एक होते. मात्र घटस्फोटानंतर आजही दोघे बिझनेस पाटर्नर आहेत. मलायकाने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवर विजे म्हणून केली. यानंतर तिने मॉडलिंगच्या जगात पाऊल ठेवले. काही अॅड्समध्ये ही मलायकाने काम केले आहे. 2008 मध्ये इमआय चित्रपटात काम केले होतो मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.