Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स मध्ये स्पर्धकांना लाभणार महेश भट्ट यांचे मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 17:12 IST

करण जोहर आणि रोहित शेट्टी यांच्यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आजच्या घडीच्या आघाडीच्या दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेला स्टार ...

करण जोहर आणि रोहित शेट्टी यांच्यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आजच्या घडीच्या आघाडीच्या दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेला स्टार प्लसवरील ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा पहिल्या पसंतीचा कार्यक्रम बनला आहे. 
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज दिग्दर्शक परीक्षक असल्यावर सुपरस्टारची निवड चुकीची होण्याचा संभवच निर्माण होत नाही. पण हा तिसरा मोठा दिग्दर्शक हा या कार्यक्रमातील स्पर्धकांना अभिनयाचे धडे देणार त्यांचे नाव आहे महेश भट. आशिकी, नाम, राज आणि इतरही अनेक अप्रतिम चित्रपट आणि नामकरणसारखी जबरदस्त लोकप्रिय मालिका यांचे निर्माता आणि दिग्दर्शक असलेले महेश भट यांनी आजवर अनेक गुणी अभिनेता आणि अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत संधी दिलेली आहे. त्यामुळे आता त्यांना या कार्यक्रमातील स्पर्धकांना मौलिक मार्गदर्शन करण्यासाठी निवडण्यात आले आहे. ते या स्पर्धकांपुढे काही आव्हाने ठेवतील आणि त्यांच्या अभिनय कामगिरीच्या मूल्यमापनानुसार या कार्यक्रमातील स्पॉटलाइट फेरीत त्यांना संधी देण्यात येईल.
महेश भट यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतून त्यांचे अजोड दिर्ग्शकीय कौशल्य दिसून येते; तसेच त्यांनी निर्माण केलेल्या काही टीव्ही मालिकांमधूनही त्यांच्या प्रतिभेची झलक वारंवार दिसून येते. आता असा प्रतिभावान दिग्दर्शक भारताचा नवा सुपरस्टार निवडण्याच्या कामी आपला सल्ला आणि सूचना देणार आहेत, ही या कार्यक्रमाच्या दृष्टीने मोठीच कमाई म्हणावी लागेल.
स्टार प्लसवर इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमामुळे सामान्य लोकांना अभिनय क्षेत्रातील त्यांची अतिशय दुर्मिळ अशी स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. या कार्यक्रमाते फॉरमॅट हे इतर रिअॅलिटी शो पेक्षा वेगळे असल्याने हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या कार्यक्रमात करण जोहर आणि रोहित शेट्टी परीक्षकाची भूमिका साकारत असून ते सामान्य लोकांसाठी बॉलिवूडचे दरवाजे केवळ खुलेच करत नाहीयेत तर त्यांच्या सिनेमांमध्ये या शोमधील विजेत्यांना ब्रेकही देणार आहेत. 

Also Read : हा प्रसिद्ध दिग्दर्शक स्पॉट बॉय म्हणून करायचा काम