Join us  

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 1:11 PM

"बरसणाऱ्या पावसामध्ये...", शिवाली परब 'पायल वाजे' गाण्यातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय शो आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. अनेक कलाकारांना हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. हास्यजत्रेच्या कोहली फॅमिलीतील अवली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. अफलातून अभिनय आणि कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते. शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत नवीन प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती देत असते.

शिवाली लवकरच नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पायल वाजे असं शिवालीच्या नव्या गाण्याचं नाव आहे. या गाण्याचे पोस्टर शेअर करत शिवालीने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. “पायल वाजे Releasing Soon…बरसणाऱ्या पावसामध्ये कोणी शोधतंय हरवलेले क्षण, कोणी पावसात अश्रू लपवून हलके करतोय मन...घेऊन येतोय 'पायल वाजे'”, असं कॅप्शन शिवालीने या पोस्टला दिलं आहे. शिवालीच्या या नव्या गाण्यासाठी चाहते आतुर आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंच करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

इलियाना डिक्रुझचा मिस्ट्री मॅन आला समोर; अभिनेत्रीने दाखवली बॉयफ्रेंडची पहिली झलक

सध्या शिवाली हास्यजत्रेच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत आहे. परदेशातही हास्यजत्रेच्या कलाकारांची क्रेझ पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील हास्यजत्रेच्या कलाकारांचे लाइव्ह शो पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याचं चित्र आहे. चाहत्यांकडून मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद पाहून हास्यजत्रेचे कलाकारही भारावून गेले आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर

दरम्यान, शिवालीने मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसली होती. याशिवाय ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतामराठी गाणी