Join us

Samir choughule : २५ वर्षांपूर्वी ‘असा’ दिसायचा समीर चौघुले, अभिनेत्याने शेअर केला फोटो, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 13:50 IST

आपल्या आवडत्या कलाकाराबाबतच्या सर्व गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. सोशल मीडियावर समीरचा मोठा चाहता वर्ग आहे.

मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. सोशल मीडियावर समीरचा मोठा चाहता वर्ग आहे. 

समीर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. समीर चौघुलेने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. १९९७ सालातील जवळपास २५ वर्षांपूर्वींचा तारुण्यातील फोटो शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करताना समीर चौघुलेने लिहिले, 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वाहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा. असं कॅप्शन त्याने दिले आहे. 

 

टॅग्स :समीर चौगुले