Join us

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरेंनी साजरा केला पत्नीचा वाढदिवस, व्हिडीओ आला चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 13:02 IST

प्रभाकर यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) मधले सर्व कलाकार आज स्टार झाले आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. चाहत्यांनी सर्वांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्यातील एक विनोदी सम्राट म्हणजे प्रभाकर मोरे. प्रभाकर यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. कोकणी शैलीत चपखल विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रभाकर मोरे (prabhakar more). आपल्या अभिनयातून, विनोदातून प्रभाकर मोरे कायमच त्यांची कोकणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा ते कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

प्रभाकर मोरे कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ते चाहत्यांच्या भेटीला येत असतात. अलिकडेच त्यांनी त्यांच्या पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचं सेलिब्रेशन त्यांच्या घरी करता येईल. बायकोसाठी प्रभाकर यांनी घरी चॉकलेट केक आणला होता. अगदी साध्या पद्धतीत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आला. 

दरम्यान, प्रभाकर मोरे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नाही तर त्यांचं शालू हे गाणंदेखील सुपरहिट आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा