Join us  

रणवीर सिंगसह झळकली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 2:03 PM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने रणवीर सिंगसह केली स्क्रीन शेअर, पोस्ट करत म्हणाली...

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय, आवडता आणि गाजलेला शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. हास्यजत्रेचे कलाकार त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करण्याबरोबरच अनेक नव्या कलाकारांना हास्यजत्रेचा मंच उपलब्ध करून देत या शोने संधी दिल्या. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे ईशा डे. हास्यजत्रेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या कलाकारांपैकी ईशा एक आहे. 

अभिनयाची उत्तम जाण असणाऱ्या ईशाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. हास्यजत्रेतून अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या ईशाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ईशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत ती बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगबरोबर दिसत आहे. ईशाची रणवीर सिंगबरोबरच्या एका जाहिरातीत वर्णी लागली आहे. या जाहिरातीचा व्हिडिओही तिने शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत ईशाने आनंद व्यक्त केला आहे. दालमिया सिमेंटची ही जाहिरात आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत हास्यजत्रेचे कलाकार आणि चाहत्यांनीही तिचं अभिनंदन केलं आहे.

 

ईशाने लंडनमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. हास्यजत्रेत येण्याआधी छोट्या पडद्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’, 'चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकांमध्ये ईशा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. तर बॉबी देओलच्या 'आश्रम २' या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती. 

टॅग्स :रणवीर सिंगमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार