छोट्या पडद्यावर 'नागिन 2'ची जादू कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 12:21 IST
छोट्या पडद्यावर जोवर 'नागिन' आहे तोवर चॅनेलला चांगला टीआरपी मिळतो हे भागित आता तंतोतंत खरे ठरत असल्याचे दिसतेय. 'नागिन'च्या ...
छोट्या पडद्यावर 'नागिन 2'ची जादू कायम
छोट्या पडद्यावर जोवर 'नागिन' आहे तोवर चॅनेलला चांगला टीआरपी मिळतो हे भागित आता तंतोतंत खरे ठरत असल्याचे दिसतेय. 'नागिन'च्या पहिल्या सिझनलाही रसिकांची अमाप लोकप्रियता मिळाली होती. 'नागिन' मालिका संपताच अनेक रसिकांनी 'नागिन' पुन्हा सुरू करण्यात यावी अशी इच्छाही व्यक्त केली होती. 'नागिन'ची लोकप्रियता पाहता मालिकेच्या टीमला पुन्हा एकदा नागिनचा दुसरा सिझन सुरू करावा लागला. दुसरा सिझनही रसिकांनी उचलुन धरला. गेल्या काही महिन्यात 'नागिन पर्व 2' टीआरपीच्या यादीत इतर मालिकांच्या तुलनेत वरचढ राहिला. या महिन्याच्या टीआरपी यादीत सर्वोत्कृष्ठ मालिका ठरली आहे. यंदाही 'नागिन 2' रसिकांची सर्वात जास्त पसंती मिळवली आहे. विशेष म्हणजे 'नागिन 2' ने 'द कपिल शर्मा शो', 'कुमकुम भाग्य','ये है मोहब्बते','बीग बॉस पर्व 10','शक्ती अस्तित्व की एहसास की' या सा-या कार्यक्रमांना मागे टाकले आहे. यावरूनच नागिनची लोकप्रियता यापुढेही वाढत जाणार हे मात्र नक्की. 'नागिन 2' मध्ये मौनी रॉय,अदा खान आणि करणवीर बोहरा मुख्य भूमिकेत आहेत.पहिला सिझन संपताच काही दिवसांनतर नागिन 2चा प्रोमो झळकताच रसिकांची या शोची उत्सुकता शिगेला पोहचली होती. तेव्हापासूनच नागिन 2 ची जौरदार चर्चा सुरू झाली होती.त्यावेळी प्रोमोमध्ये शिवन्या बनलेली मौनी रॉय नागमणिवर आलेल्या संकटामुळे काळजीत पडलीय. यावेळी शिवन्या नागमणि वाचवण्यात यशस्वी ठरते का? असे अनेक प्रश्न रसिकांना पडले होते. पहिल्या सिझन प्रमाणेच दुस-या सिझनसाठी मौनी रॉयचे रसिकांकडून विशेष कौतुक होत आहे.16 ऑक्टोबरपासून नागिनचा दुसरा सीझन रसिकांच्या भेटीला आला आहे.