Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दिवाने 3’मध्ये कोरोनाचा विस्फोट, 18 क्रू मेंबर्स पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 10:24 IST

Dance Deewane 3 : टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ; माधुरी दीक्षित व शोचे अन्य परिक्षक स्वस्थ

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वास कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाने ग्रासले आहे.

कोरोनाचा कहर वाढत असताना आता शूटींगस्थळीही व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळतोय. माधुरी दीक्षित जज असलेल्या ‘डान्स दिवाने 3’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. शोमधील तब्बल 18 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. माधुरी दीक्षित व शोचे अन्य परिक्षक स्वस्थ असून सध्या ते क्वारंटाइनमध्ये असल्याचे कळतेय. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.‘डान्स दीवाने’ शोचा हा तिसरा सीझन आहे. शोमध्ये माधुरी दीक्षितसोबत कोरिओग्राफर धर्मेश येलांडे व तुषार कालिया परिक्षकाच्या भूमिकेत आहेत. तर राघव जुएल शोचा होस्ट आहे.

 फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉइज (एफडब्ल्सूआयसीई)चे महासचिव अशोक दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ‘डान्स दिवाने 3’ शोमध्ये बॅकस्टेज काम करणा-या 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी या सर्वांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यांच्या जागी अन्य लोकांना घेऊन शूटींग पूर्ण केले गेले. सेटवर कोरोनाचा हा विस्फोट बघून सगळीकडे खळबळ माजली. माधुरी व शोचे अन्य जज स्वस्थ असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान सध्या शोचे सर्व कलाकार क्वारंटाइनमध्ये असल्याचे कळतेय. यामुळे शो अर्ध्यावरच थांबणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वास कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाने ग्रासले आहे. यात आमिर खान, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, तारा सुतारिया, कार्तिक आर्यन आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षितकोरोना वायरस बातम्याटेलिव्हिजन