Join us  

‘अण्णा नाईक’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा, सौंदर्याच्या बाबतीत शेवंतालाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 8:19 PM

वैयक्तीक जीवनाच्या सुंदरतेचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची पत्नी रेखा अभ्यंकर. गेल्या काही महिन्यांत रेखा अभ्यंकर देखील चर्चेत आल्या आहेत.

 'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेतील लोकप्रिय पात्र अण्णा आणि शेवंता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अण्णा नाईक ही भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर आणि शेवंता भूमिका साकारणारी अपूर्वा नेमळेकर. या दोघांच्या भूमिकेमुळे यापूर्वीचे दोन भाग रसिकांना खिळवून ठेवण्यात चांगलेच यश आले. मालिकेचे दोन्ही भाग रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्यामुळे पुन्हा एकदा 'रात्रीस खेळ चाले ३' भेटीला आले आहे.

या मालिकेमुळे अण्णा नाईक पुन्हा चर्चेत आले आहेत.  दुस-या भागात अण्णा नाईक आणि शेवंता यांची प्रेमकहाणी पाहायला मिळाली. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? ऑनस्क्रीन शेवंताच्या सौंदर्यावर फिदा होणारे अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर यांच्या ख-या आयुष्यातील पत्नी देखील खूप सुंदर आहे. होय त्यामुळेच माधव अभ्यंकर याचं खासगी आणि वैयक्तीक जीवनही तितकंच सुंदर आहे.

त्याच्या वैयक्तीक जीवनाच्या सुंदरतेचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची पत्नी रेखा अभ्यंकर. गेल्या काही महिन्यांत रेखा अभ्यंकर देखील चर्चेत आल्या आहेत. रेखा अभ्यंकर यांच्या सौंदर्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. माधव आणि रेखा यांना दोन मुली आहेत. रेखा यांचा अभिनयक्षेत्राशी संबंध नाही. 

 

 

काही होर्डिंग्स रात्रीच दिसतात ! 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेचे हे एक आगळंवेगळं होर्डिंग तुम्ही पाहिले का?

रात्रीस खेळ चाले ३’ सुरु झाल्यापासून रसिकांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मात्र रसिक मालिकेत शेवंता आणि अन्ना नाईक या पात्रांना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.सुरुवातीच्या दोन्ही भागात सर्वच कलाकारांनी जीव ओतून आपल्या भूमिका साकारल्या होती, त्यामुळे आजही ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती अन्ना आणि शेवंता या पात्रांना.मालिकेत माधव अभ्यंकर यांनी साकारलेले खलनायक अण्णा नाईक या पात्राने तर प्रत्येकाच्याच मनात धडकी भरवली होती.

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३अपूर्वा नेमळेकर