लुब्ना सलिम झळकणार चक्रव्युह या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 15:48 IST
बा बहू और बेबी या मालिकेत लुब्ना सलिमने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तिने अनेक मालिकांमध्ये एकापेक्षा एक ...
लुब्ना सलिम झळकणार चक्रव्युह या मालिकेत
बा बहू और बेबी या मालिकेत लुब्ना सलिमने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तिने अनेक मालिकांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. तसेच ओह माय गॉड या चित्रपटात ती परेश रावलच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. लुब्नाने केवळ छोट्या पड्यादवरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही खूपच चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. आज लुब्ना हे छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावरचे मोठे नाव आहे. पण लुब्ना गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने तिने छोट्या पडद्यापासून दूर राहाणे पसंत केले होते. तिने 2025 जाने क्या होगा आगे या मालिकेत शेवटचे काम केले होते. पण आता ती लवकरच एका मालिकेद्वारे कमबॅक करणार आहे. चक्रव्युह असे या मालिकेचे नाव असून या मालिकेची निर्मिती संज्योत कौर आणि भुपिंदर सिंग यांनी केली आहे तर अश्विनी चौधरी या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहे. या मालिकेची निर्मिती आधी राजेश राम सिंग आणि अमित सिंग करणार होते. पण काही कारणास्तव त्यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली आणि संज्योत कौर आणि भुपिंदर सिंग यांनी या मालिकेची निर्मिती करण्याचे ठरवले.चक्रव्यूह या मालिकेत महिमा मखवाना आणि नारायणी शास्त्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लुब्ना या मालिकेत महिमाच्या आईची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेतील महिमाच्या आईची भूमिका अतिशय सशक्त असल्याने या भूमिकेसाठी लुब्नाची निवड करण्यात आली. ही भूमिका पूर्वी सीमा पाहवा साकारणार होत्या. पण त्यांची जागा आता लुब्नाने घेतली आहे.