रोडिजनंतर आता बिग बॉस-10 वर नजर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 12:06 IST
एमटीव्ही रोडिज एक्स-4 जिंकल्यानंतर बलराजसिंग खेरा याची अवस्था जणू आज मैं उपर आसमाँ नीचे अशीच काहीशी झालीय.. आपण काहीही ...
रोडिजनंतर आता बिग बॉस-10 वर नजर !
एमटीव्ही रोडिज एक्स-4 जिंकल्यानंतर बलराजसिंग खेरा याची अवस्था जणू आज मैं उपर आसमाँ नीचे अशीच काहीशी झालीय.. आपण काहीही करु शकतो असं त्याला वाटू लागलाय.. त्यामुळंच आता त्याची नजर बिग बॉसवर आहे. जालंधरचा एमबीए पदवीधारक असलेला बलराज स्वतःला बिग बॉस-10 सीझनसाठी पात्र असल्याचं समजतोय.बिग बॉसच्या आगामी सीझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तर मी त्यात नक्की सहभागी होईन असं बलराजनं म्हटलंय. आपण स्टंट तर करु शकतो, शिवाय रसिकांचं मनोरंजन करण्याची क्षमताही आपल्यात असल्याचं बलराजनं सांगितलंय.शोमध्ये राहून स्वतःची ओळख टिकवून ठेवणं मोठं आव्हात्मक असतं, जे आपण करु शकतो असंही त्याला वाटतं.. आता याला बलराजचा आत्मविश्वास म्हणावं की अति-आत्मविश्वास.