Join us

'झलक दिखला जा'च्या पाहुण्यांची यादी वाढता वाढे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 12:29 IST

 डान्स रियालिटी शो 'झलक दिखला जा'चा नवा सीझन अद्याप सुरु झालेला नाही. असं असतानाही या शोमध्ये हजेरी लावणा-या सेलिब्रिटी ...

 डान्स रियालिटी शो 'झलक दिखला जा'चा नवा सीझन अद्याप सुरु झालेला नाही. असं असतानाही या शोमध्ये हजेरी लावणा-या सेलिब्रिटी पाहुण्यांची यादी बाहेर येऊ लागलीय. या शोच्या पहिल्यावहिल्या भागात अभिनेता हृतिक रोशन हजेरी लावणार असल्याचं बोललं जातंय.त्यात आता बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमारसुद्धा झलकमध्ये झळकणार असल्याचं वृत्त आहे. आगामी 'रुस्तम' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्की झलकच्या सेटवर येणार आहे. तर याआधी हृतिकसुद्धा 'मोहन्जेंदडो' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार असल्याचं बोललं जातंय. हृतिकचा मोहन्जेंदडो आणि अक्षयचा रुस्तम हे दोन्ही सिनेमा एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर झळकतायत. या दोन्ही बॉलीवुड स्टार्सच्या झलकमध्ये येण्याच्या चर्चा सुरु असल्या तरी यावर कुणीही शिक्कामोर्तब केलेलं नाही.