Join us
Daily Top 2Weekly Top 5

लीनेशने हरली पैज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 17:07 IST

इश्कबाज या मालिकेत नकुल मेहता, कुणाल जयसिंग आणि लिनेश मट्टू हे तिघे भावांची भूमिका साकारत आहेत. या तिघांची सध्या सेटवर चांगलीच ...

इश्कबाज या मालिकेत नकुल मेहता, कुणाल जयसिंग आणि लिनेश मट्टू हे तिघे भावांची भूमिका साकारत आहेत. या तिघांची सध्या सेटवर चांगलीच गट्टी जमली आहे. लिनेशने नकुल आणि कुणालसोबत एक पैज लावली होती. ही पैज हरल्यानंतर शिक्षा म्हणून नकुल आणि कुणालने लिनेशला चहावाला बनायला सांगितले आणि लिनेशनेही ते हसत स्वीकारले. त्याने मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी केवळ चहा बनवलाच नाही तर त्यानेच तो सगळ्यांना सर्व्ह केला. लिनेश सांगतो, "मी मुंबईत एकटाच राहात असल्याने मला चहाच काय तर सगळा स्वयंपाकही बनवायला येतो. चहा बनवणे ही तर माझ्यासाठी अतिशय किरकोळ गोष्ट आहे.