Join us

लीना जुमानीला ‘कोमोलिका’पासून मिळाली प्रेरणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 12:06 IST

छोट्या पडद्यावरील 'कुमकुम भाग्य' या मालिकेतील अभिनेत्री लीना जुमानीसाकारत असलेली 'तनु' ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतेय.खलनायिकाभूमिका ...

छोट्या पडद्यावरील 'कुमकुम भाग्य' या मालिकेतील अभिनेत्री लीना जुमानीसाकारत असलेली 'तनु' ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतेय.खलनायिकाभूमिका असूनही रसिकांची मनं लीना जुमानीनं जिंकलीत. ही भूमिकासाकारण्यासाठी लीनाला प्रेरणा मिळालीय ती कोमोलिकापासून.उर्वशीढोलकिया हिनं साकारलेली कोमोलिका छोट्या पडद्यावरील खलनायिकांच्याभूमिकेतील माईलस्टोन ठरल्याचं लीनाला वाटतं. त्यामुळंच कोमोलिकाचाअंदाज, स्टाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनय यानं छोट्यापडद्यावरील खलनायिका म्हणून नवे मापदंड रचल्याचं लीनानं सांगितलंय.याआधी कायमच पॉझिटिव्ह भूमिका साकारणा-या लीनासाठी अशाप्रकारची निगेटिव्हभूमिका मोठी आव्हानात्मक होती. मात्र एक आव्हान म्हणून लीनानं ही भूमिकास्वीकारली आणि अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवलंय.