Join us

ससुराल सिमर का मालिका घेणार लीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 11:50 IST

ससुराल सिमर का ही मालिका लवकरच सहा वर्षांचा लीप घेणार आहे. सहा वर्षांनंतर सिमर आणि प्रेम वेगवेगळे राहात असल्याचे ...

ससुराल सिमर का ही मालिका लवकरच सहा वर्षांचा लीप घेणार आहे. सहा वर्षांनंतर सिमर आणि प्रेम वेगवेगळे राहात असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिमर एका कुटुंबामध्ये मुलं सांभाळण्याचे काम करणार आहे. सिमरला घरातून बाहेर काढल्यानंतर कपूर कुटुंब तिला त्यांच्या घरात राहायला देणार आहे. या मालिकेत लवकरच रुशद राणाची एंट्री होणार आहे. रुशद हा कपूर कुटुंबाचा कुटुंबप्रमुख आहे. पण त्याचसोबत तो सिमरचा पूर्वप्रियकर आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याला मुलेही आहेत. त्याच्या पत्नीची भूमिका जसवीर कौर साकारणार आहे. रुशदच्या आगमनामुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे.