Join us
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स उत्सव २०१७” चा आजपासून शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 14:34 IST

मालाड मधील प्रख्यात पी.डी लायन्स कॉलेज येथे २८ व्या “दालमिया लायन्स उत्सव १७” चा २१ डिसेंबर २०१७ रोजी शुभारंभ झाला. मिराकेम ...

मालाड मधील प्रख्यात पी.डी लायन्स कॉलेज येथे २८ व्या दालमिया लायन्स उत्सव १७ चा २१ डिसेंबर २०१७ रोजी शुभारंभ झाला. मिराकेम इंडस्ट्रीज चे संचालक अनिल मुरारका आणि  हास्य कलाकर नवीन प्रभाकर हे उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते या सोबतच  समारंभात कॉलेजचे प्राचार्य एन.एन पांडेगावरिंग काउन्सील चे वाईस चेअरमन लायन शरद रुईयागावरिंग काउन्सील चे सेक्रेटरी कन्हायालाल सराफ, शिक्षक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते. २१ डिसेंबर व २२ डिसेंबर २०१७ रोजी होणाऱ्या या सोहळ्यात परफोर्मिंग आर्ट्सलिटररी आर्ट्स(साहित्यिक कला)फाईन आर्ट्स (ललित कला)गेमिंग अंड स्पोर्ट्समँनेजमेंन्ट अंड फिल्म फेस्टइनफोर्मलआणि आय.टी फेस्ट सर्व अश्या प्रकारच्या स्पर्धा होणार आहे.

परफोर्मिंग आर्ट्स या विभागातील मुंबईकर डान्स आणि बजाते रहो या दोन नवीन स्पर्धां विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षित ठरल्या व विद्यार्थ्यांनी आनंद फार घेतला. २० कॉलेजमधून तब्बल १५० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. संगीत हे वाद्याचा वापर करूनच निर्माण करता येते असे नाही आहे. संगीत आपण कोणतेही साधन किंवा वाद्याचा वापर करून निर्माण करू शकतो. अशीच काहीशी बजाते रहो” या स्पर्धा मागची संकल्पना होती. हि स्पर्धा मल्टी इन्स्ट्रमेंन्ट असून या स्पर्धेत ढोलताशाचमचेकाठी इत्यादि साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी संगीत तयार केले..

डी.एल.यु मध्ये सात प्रमुख विभाग असून त्यात कब्बडीखो-खोलगोरीफेस पेंटिंगमेहंदी व्ही.जे हंटशोर्ट फिम्ल आणि बर्याच अश्या विविध ५० स्पर्धांचा समावेश आहे. मुंबईतील ८५ कॉलेज मधल्या ८५० विद्यार्थ्यांनी अगोदरच आपली नोंदणी केली आहे.