Join us
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी सदैव मंगलमच्या सेटवर सुरभी हांडे आणि समृद्धी केळकर बनल्या बेस्ट फ्रेंड्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 14:49 IST

कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मीचा विवाह सोहळा तब्बल एक आठवडा रंगला. ज्यामध्ये बरेच चढ–उतार बघायला मिळाले. सर्व ...

कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मीचा विवाह सोहळा तब्बल एक आठवडा रंगला. ज्यामध्ये बरेच चढ–उतार बघायला मिळाले. सर्व अडचणीवर मात करत आणि आजीच्या पाठिंब्यामुळे लक्ष्मी आणि मल्हारचे लग्न झाले आणि लक्ष्मी मामीच्या जाचामधून सुटली. त्यामुळे आजीला देखील आनंद झाला. येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना मालिकेमध्ये बऱ्याच घटना बघायला मिळणार आहेत. तसेच मालिकेमध्ये आर्वी आणि लक्ष्मीची भेट अपघाताने होणार आहे. ज्यामधून हळूहळू त्या दोघींची मालिकेमध्ये चांगलीच गट्टी जमणार आहे. त्या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होणार आहेत. गावावरून आल्यामुळे आर्वीच्या घराच्या प्रेमात पडणारी लक्ष्मी या गोष्टीशी अनभिज्ञ आहे की, आर्वी मल्हारची होणारी बायको असून तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. आता मालिकेमध्ये आर्वी आणि लक्ष्मी एकमेकींसमोर आल्यानंतर काय होणार? त्यांची मैत्री कशी होईल? मल्हार लक्ष्मीसमोर आला तर? आर्वीला मल्हार आणि लक्ष्मीच्या लग्नाचं सत्य कळालं तर? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेत मिळणार आहेत. आर्वी लक्ष्मीच्या बऱ्याचशा गोष्टींना सांभाळून घेताना दिसणार आहे. लक्ष्मी आर्वीला स्वत:चे नावं लच्छी असे सांगणार आहे. पहिल्यांदाच शहरामध्ये आल्यामुळे लक्ष्मीला आर्वीच्या घरामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी दिसणार आहेत, ज्याचे तिला खूपच अप्रूप वाटणार आहे. जसे पहिल्यांदाच ओव्हन बघून तिला आश्चर्य वाटणार आहे. आर्वी तिला वेगवेगळे पदार्थ बनवून देणार आहे. ती पहिल्यांदाच नुडल्स खाणार आहे आणि त्यानंतर लक्ष्मी त्या पदार्थाला एक नवीनच नावं ठेवणार आहे, असे बरेचसे मजेदार किस्से प्रेक्षकांना मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. एका छोट्या गावामधून आलेल्या मुलीला म्हणजेच लक्ष्मीला आर्वी खूप सांभाळून घेणार आहे, तिला प्रेम देणार आहे. जे खूप कमी बघायला मिळतं. आर्वीच्या आईचा विरोध पत्करून ती लक्ष्मीला घरामध्ये ठेवणार आहे. सेटवरसुद्धा आर्वी आणि लक्ष्मीची चांगलीच धम्माल मस्ती सुरू असते. सुरभी आणि समृद्धीचे ऑफस्क्रीन देखील खूपच छान बॉन्डिंग जमले आहे आणि जे आता प्रेक्षकांना मालिकेमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे. पहिल्या दिवसापासून सेटवर खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सगळे कलाकार चित्रीकरणातील अनेक तास एकत्र असतात. त्यामुळे बऱ्याचशा गप्पा, सीनच्या मध्ये सेल्फी काढणे, एकत्र सेटवर जेवणे अशी मजा मस्ती सुरू असते. त्यामुळे त्यांना कामाचा ताण देखील जाणवत नाही. मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर हे सेटवर वेळ मिळाला की, UNO हा गेम खेळतात. या तिघांनाही हा खेळ खेळायला खूपच आवडतो. तसेच सेटवर सुरभी आणि ओमप्रकाशला फोटो काढण्याची तितकीशी आवड नाहीये. परंतु समृद्धीला मात्र सेल्फी, फोटोज काढायला खूपच आवडते. तसेच समृद्धी सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टिव्ह आहे.Also Read : लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवरील लक्ष्मी आणि बाब्याची धम्माल !