कुणालला बनायचेय पेंटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 15:13 IST
इश्कबाज या मालिकेत ओमकारा सिंग ओबेरॉय ही भूमिका साकारत असलेला कुणाल जयसिंगचा सध्या पेंटर बनण्याचा विचार आहे. कुणाल इश्कबाज ...
कुणालला बनायचेय पेंटर
इश्कबाज या मालिकेत ओमकारा सिंग ओबेरॉय ही भूमिका साकारत असलेला कुणाल जयसिंगचा सध्या पेंटर बनण्याचा विचार आहे. कुणाल इश्कबाज या मालिकेत एका पेंटरचीच भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे चित्रकला शिकण्याची आवड त्याच्यात निर्माण झाली आहे. त्याला त्याच्या वडिलांचे चित्र काढण्याची इच्छा आहे. त्यासाठी तो लवकरच चित्र काढायला शिकणार आहे असे तो सांगतो. सध्या लंचब्रेकमध्ये वेळ काढून तो चित्रच काढत असतो. त्याला लवकरात लवकर त्याच्या वडिलांना त्यांचे चित्र काढून ते गिफ्ट करायचे आहे असेही तो सांगतो.