Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कुमकुम भाग्य’ मालिकेत येणार २० लिप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 15:54 IST

झेपेनंतर ह्या शोमध्ये अभि, प्रग्या आणि त्यांच्या तरूण महाविद्यालयीन मुली रिया आणि प्राची यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.

छोट्या पडद्यावरील सातत्याने टॉप-रेटेड फिक्शन मालिका ‘कुमकुम भाग्य’ गेली ५ वर्षे सगळ्‌यांच्या रात्रीच्या जेवण्याच्या वेळेमध्ये टेलिव्हिजनवर राज्य करत आहे. प्रेक्षकांच्या मनात जागा बनवल्यानंतर ह्या शो मधील प्रमुख जोडी प्रग्या आणि अभी000 ही टीव्हीवरील सर्वांत लाडके प्रेमी युगुल बनले. भावभावनांचा कल्लोळ, नात्यांमधील समस्या, पारिवारिक जटिलता, नकारात्मक अशा सर्व गोष्टींनी त्यांना विभक्तही ठेवले. आता त्यांच्या ह्या कथेत २० वर्षांची झेप घेण्यात येणार असून प्रेक्षकांची भेट होणार आहे मेहरांच्या पुढच्या पिढीसोबत आणि त्या असणार आहेत अभिप्रग्या यांच्या जुळ्‌या मुली.

ह्या झेपेच्या संध्येला ह्या शोमध्ये अनपेक्षित वळणे पाहायला मिळतील. प्रेमी युगुल तनु (लीना जुमानी) आणि किंग सिंग (मिशाल रहेजा) हे अभि आणि प्रग्या यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करण्यासाठी कटकारस्थान रचतील. प्रग्या जुळ्‌या मुली प्राची आणि रिया यांना जन्म देईल, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही कारण परिस्थिती पुन्हा एकदा अभि आणि प्रग्या यांना विलग करेल.

झेपेनंतर ह्या शोमध्ये अभि, प्रग्या आणि त्यांच्या तरूण महाविद्यालयीन मुली रिया आणि प्राची यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. जन्माने जुळ्‌या असल्या तरी त्या दोघींचेही आपले असे बळकट व्यक्तिमत्त्व आहे. त्या एकमेकींच्या अगदी विरूद्ध स्वभावाच्या आहेत. एका बाजूला प्राची साधेपणा, व्यावहारिकता आणि संवेदनशीलतेसह अगदी प्रग्यासारखी आहे तर दुसऱ्या बाजूला रिया अगदी श्रीमंतीत वाढलेली एका यशस्वी रॉकस्टारची लाडावलेली मुलगी आहे. काय होईल जेव्हा ह्या दोन अगदी विरूद्ध स्वभावाच्या दोन्ही बहिणी एकमेकींसमोर येतील? काय ह्या अभि आणि प्रग्या यांना एकत्र आणू शकतील? ते तर केवळ वेळच सांगू शकेल.