Join us

​कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह बनले माता-पिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 13:46 IST

कृष्णा अभिषेक लवकरच प्रेक्षकांना ड्रामा कंपनी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात अली असगर, सुदेश लहरी, मिथुन चक्रवर्तीसारखे ...

कृष्णा अभिषेक लवकरच प्रेक्षकांना ड्रामा कंपनी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात अली असगर, सुदेश लहरी, मिथुन चक्रवर्तीसारखे दिग्गज काम करणार आहेत. ड्रामा कंपनी या कार्यक्रमाची गेल्या कित्येक दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. कृष्णा अभिषेक या कार्यक्रमामुळे सध्या खूप खुश आहे. पण त्याचसोबत त्याला खूश होण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. कृष्णा अभिषेक नुकताच पप्पा बनला आहे. कृष्णा आणि त्याची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह हे सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील बनले आहेत. कश्मीरा आणि अभिषेक यांना जुळी मुले झाले असून सहा आठवड्यांपूर्वी त्यांच्या मुलांचा जन्म झाला आहे. सध्या ही दोन्ही बाळं एका रुग्णालयातील एनआईसीयू विभागात आहेत. कश्मीरा आणि अभिषेक त्यांचा जास्तीत जास्त वेळ रुग्णायलात घालवत आहेत. कृष्णा सध्या त्याच्या ड्रामा कंपनी या कार्यक्रमात चांगलाच व्यग्र आहे. या कार्यक्रमासाठी तो खूप मेहनत घेत आहे. त्याने याआधी कॉमेडी नाईट्स बचाओ, कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच त्याने बोल बच्चन, इट्स एन्टरटेनमेंट यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर कश्मीरादेखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने यस बॉस, प्यार तो होना ही था, वेकअप सिड, कही प्यार न हो जाये यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती बिग बॉसमध्ये देखील झळकली होती. कश्मीरा आणि कृष्णा यांनी 2013मध्ये लग्न केले. काही कॉमन फ्रेंड्समुळे त्या दोघांची ओळख झाली होती. कश्मीराचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न एका उद्योगपतीसोबत झाले होते. Also Read : सैराट चित्रपटातील हा कलाकार काम करणार कृष्णा अभिषेकसोबत द ड्रामा कंपनीमध्ये