Join us  

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ मालिकेतील 'दुश्मन' खऱ्या आयुष्यात आहेत खास मित्र, जाणून घ्या कोण?!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 1:47 PM

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ ही मालिका शेवटच्या टप्प्य्यात आहे. पण मालिकेतील कलाकारांची चर्चा मात्र आजही जोरात आहे. सध्या चर्चा आहे ती आमदार बाईंच्या नवऱ्याची. होय, आम्ही बोलतोय ते माजी आमदार जनार्दन गायकवाडबद्दल.

‘देवमाणूस 2’ ( Devmanus 2 ) ही मालिका शेवटच्या टप्प्य्यात आहे. पण मालिकेतील कलाकारांची चर्चा मात्र आजही जोरात आहे. सध्या चर्चा आहे ती आमदार बाईंच्या नवऱ्याची. होय, आम्ही बोलतोय ते माजी आमदार जनार्दन गायकवाडबद्दल. ‘देवमाणूस 2’ या मालिकेतील माजी आमदार जनार्दन गायकवाड हे कॅरेक्टर सध्या चांगलंच भाव खाऊन जातंय. या कॅरेक्टरवरचे एक ना अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.

या कॅरेक्टरची ओळख तुम्हाला असेलच. तो दोन टर्म आमदार होता. तिसऱ्यांदा आमदारकीसाठी मतदारसंघ आरक्षित होतो म्हणून बायकोला उभा करतो. तिला राजकारणात आणतो आणि कालांतराने त्याची बायकोचं त्याच्यापेक्षा वरचढ चढते. अगदी ती त्याला जीवे मारण्याचा प्लान आखते आणि यासाठी डॉक्टर अजित कुमारला सुपारी देते. पण आताश: आमदार बाई आणि जनार्दन या नवराबायकोमधील वाद मिटले आहेत आणि आता डॉ. अजितकुमारला अडकवण्याच्या जामकरांच्या प्लानमध्ये ते सहभागी झाले आहेत. आमदारबाईच्या नवऱ्याची अर्थात माजी आमदार जनार्दन गायकवाडची भूमिका साकारली आहे ती अभिनेता विनोद पुलावळे याने.

आज याच अभिनेत्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. मालिकेत विनोद डॉ. अजितकुमारला अडवण्याच्या प्रयत्नात असला तरी खऱ्या आयुष्यात विनोद व डॉक्टर अजितकुमार चांगले मित्र आहेत. होय, विनोद व अजित कुमारची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड हे दोघे जुने मित्र आहेत.

विनोद व किरण यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात एकत्रच केली. आज हे दोघे मित्र ‘देवमाणूस 2’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. विनोद पुलावळे याने याआधी ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत एक छोटीशी भूमिका साकारली होती. अनेक चित्रपटातही त्याने भूमिका साकारल्या.

‘व्हेंटिलेटर’ या बहुचर्चित मराठी चित्रपटात तो झळकला. यातील त्याच्या विनोदी भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं. संजय दत्त निर्मित ‘बाबा’ या चित्रपटातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत त्याने स्क्रिन शेअर केली. याशिवाय ‘भास्कर बेचैन’ या शॉर्ट फिल्ममध्येही त्याने दमदार भूमिका साकारली. लवकरच ‘रूप नगर के चिते’ या चित्रपटात तो झळकणार आहे.

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाकिरण गायकवाडटेलिव्हिजनझी मराठी