Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर किंगखानचे पाडवा सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 21:52 IST

आपल्या आगामी ‘फॅन’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहरुखने ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर हजेरी लावली. सेटवर त्याचे अगदी मराठमोळ्या पद्धतीने ...

आपल्या आगामी ‘फॅन’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहरुखने ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर हजेरी लावली. सेटवर त्याचे अगदी मराठमोळ्या पद्धतीने फेटा बांधून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. याशिवाय त्याच्या हस्ते गुढीही उभारण्यात आली. ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर आजपर्यंत मराठी चित्रपट  आणि नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली. यातच बॉलिवूडच्या अभिनेत्यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची उत्सुकता दाखविली आहे. आजपर्यंत या कार्यक्रमात रितेश देशमुख, सोनम कपूर, जॉन अब्राहम आदी कलाकारांनी हजेरी लावली आहे. या पंक्तीत आता बॉलिवूड किंग शाहरूख खानचाही समावेश आहे.