Join us
Daily Top 2Weekly Top 5

​खिचडी मालिका परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 15:43 IST

खिचडी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील इंग्रजी भाषेवरचे विनोद, हंसा आणि प्रफुल्ल यांची जोडी, बाबूजी, हिमांशू, ...

खिचडी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील इंग्रजी भाषेवरचे विनोद, हंसा आणि प्रफुल्ल यांची जोडी, बाबूजी, हिमांशू, जयश्री प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत. या मालिकेत राजीव मेहता, सुप्रिया पाठक, आनंग देसाई, जे.डी.मजेठिया आणि वंदना पाठक यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या सगळ्यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेवर खिचडी नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. या चित्रपटातदेखील या मालिकेतील कलाकारांनीच भूमिका साकारल्या होत्या.खिचडी ही मालिका संपल्यानंतर या मालिकेचा दुसरा सिझन यावा अशी या मालिकेच्या अनेक फॅन्सची इच्छा होती. ही मालिका आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे कळतेय. जे.डी.मजेठिया यांची साराभाई व्हर्सेस साराभाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. प्रेक्षकांच्या मागणीमुळे ही मालिका आता वेब सिरिजच्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेनंतर आता खिचडी परतणार आहे. जे.डी.मजेठिया यांनीच खिचडी परतणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेच्या पत्रकार परिषदेच्या वेळीच जे.डी.मजेठियाने ही घोषणा केली होती.खिचडी ही मालिका परत येणार असून या मालिकेत काही वर्षांचा लीप घेतला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत बालकलाकाराच्या भूमिकेत दिसलेले चक्की आणि जॅकी आता मोठे झालेले दाखवणार असल्याचे कळतेय. जॅकी आणि चक्कीची भूमिका छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध कलाकार साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. खिचडी या मालिकेसाठी नुकतेच सुप्रिया पाठक, राजीव मेहता, आनंग देसाई, जे.डी.मजेठिया, वंदना पाठक यांनी चित्रीकरण केले असल्याची चर्चा आहे.