Join us
Daily Top 2Weekly Top 5

किथ सिक्वेराने केला रोचेल रावसोबत साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 10:34 IST

किथ सिक्वेरा आणि रोचेल राव हे छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध कपल मानले जाते. ते दोघे बिग बॉमध्येदेखील झळकले होते. ...

किथ सिक्वेरा आणि रोचेल राव हे छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध कपल मानले जाते. ते दोघे बिग बॉमध्येदेखील झळकले होते. त्यावेळी त्यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. किथ आणि रोचेल अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांनी कधीच आपले नाते मीडियापासून लपवून ठेवले नाही.किथ आणि रोचेल यांनी व्हेलेंटाईन डेच्या दिवशी साखरपुडा केला. या साखरपुड्याविषयी किथ सांगतो, "रोचेलला लग्नासाठी मागणी घालण्यासाठी कशाप्रकारे प्रपोज करायचे हे कित्येक दिवसांपासून माझ्या डोक्यात सुरू होते. रोचेलला मला अंदमानला नेऊन समुद्रकिनारी अथवा एखाद्या पर्वतावर नेऊन निर्सगाच्या सान्निध्यात प्रपोज करायचे होते. पण आमच्या दोघांच्या कामाच्या व्यग्र शेड्युलमळे आम्हाला कुठे बाहेर जाता आले नाही. त्यामुळे मी तिला घरातच प्रपोज केले. ती माझ्या घरी आली असता तू माझ्याशी लग्न करशील का हा प्रश्न मी तिला रॉमेंटिक अंदाजात विचारला. तिनेदेखील क्षणात माझे प्रपोजल स्वीकारले. तो क्षण आमच्या दोघांसाठी खूपच खास होता. मी रोचेलच्या हातात अंगठी घातली. आम्ही अतिशय साधेपणाने साखरपुडा केला. सध्या लग्न कधी करायचा याबाबत आम्ही काहीही विचार केलेला नाही. सध्या आम्हाला दोघांना आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण खूप चांगल्याप्रकारे जगायचा आहे. तसेच आम्हाला दोघांना कामांवर लक्ष केंद्रित करायचे आहे." किथने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर साखरपुड्यानंतरचे फोटो पोस्ट केले आहेत. आणि त्या फोटोंच्या खाली ती मला हो बोलली असे लिहिले आहे.किथच्या आयुष्यात रोचेल येण्यापूर्वी त्याचे लग्न झालेले होते. सलामी या चित्रपटात झळकलेली संयुक्ता सिंग त्याची पहिली पत्नी आहे.