क्या हाल मिस्टर पांचाल? असे या मालिकेचे नाव असून ही मालिका स्टार भारत या वाहिनीवर झळकणार आहे. लाइफ ओके या वाहिनीचे नाव बदलून स्टार भारत असे ठेवण्यात आले आहे. क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेत एक आई आपल्या मुलाला सर्वगुणसंपन्न पत्नी मिळावी यासाठी देवाकडे नवस करते. पण एका मुलीत सगळेच गुण नसल्याने देवाच्या आशीर्वादामुळे तिच्या मुलाचे लग्न पाच मुलींशी होते आणि तिथून सुरू होते या मालिकेत खरी धमाल-मस्ती...
क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेची निर्मिती विपुल डी शाह यांनी केली असून या मालिकेत कांचन गुप्ता आणि मनिंदर सिंग यांची मुख्य भूमिका आहे. एक सासू आणि पाच सुना असलेली ही मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवणार यात काहीच शंका नाही.
Also Read : केदार शिंदे करणार गुजराती नाटकाचे दिग्दर्शन