प्रोमोमध्ये अमिताभ म्हणतात की, ‘होय, १७ जूनपासून रात्री ९ वाजता सुरू होणार आहेत माझे प्रश्न आणि केबीसी रजिस्ट्रेशन’. या प्रोमोमधून बिग-बी एकप्रकारे रजिस्ट्रेशनची तारीख जाहीर करीत आहेत. दरम्यान, बिग-बीने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरूनदेखील त्यांच्या चाहत्यांसाठी केबीसीचा प्रोमो शेअर केला आहे. ‘टी-२४५१ केबीसी इज बॅक.’
अमिताभ यांनी त्यांच्या अकाउंटवर पोस्टर आणि व्हिडीओ शेअर करताच त्यांच्या फॅन्सनी हजारोंच्या संख्येने कॉमेंट्स दिल्या. शिवाय त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावदेखील करण्यात आला. यावेळी या शोचा फॉर्मेट सुरुवातीपेक्षा लहान ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे देशभरातील केवळ दोनशे स्पर्धकच या शोमध्ये सहभागी होणार आहेत. या अगोदरच्या भागाचा विचार केल्यास त्यामध्ये स्पर्धकांची संख्या अधिक होती. मात्र यावेळेस निर्मात्यांनी त्यात बदल केला आहे.}}}} ">T 2451 - KBC is back .. !!! BAADDUUUMMBAAAAA ! pic.twitter.com/LECpPweqyJ— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 10, 2017
वास्तविक गेल्या वर्षीच डिसेंबर २०१६ मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी हिंड दिली होती की, ते छोट्या पडद्यावर परतणार आहेत. त्यानुसार ते या शोमधून परतत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोची सुरुवात २००० मध्ये झाली होती. हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. शिवाय अमिताभ यांची प्रश्न विचारण्याची खास शैलीही प्रेक्षकांना भावणारी आहे. या शोमुळे अमिताभ यांचे करियर सावरण्यास मदत झाली होती.