KBC10:पुन्हा रंगणार केबीसीचा रंगमंच, पुन्हा ऐकू येणार देवीयों और सज्जनों....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 14:20 IST
''देवीयों और सज्जनों'' हे शब्द लवकरच पुन्हा एकदा कानावर पडणार आहेत, पुन्हा एकदा रंगणार प्रश्नांचा रंगमंच, पुन्हा उलगडणार अनेकांचं ...
KBC10:पुन्हा रंगणार केबीसीचा रंगमंच, पुन्हा ऐकू येणार देवीयों और सज्जनों....
''देवीयों और सज्जनों'' हे शब्द लवकरच पुन्हा एकदा कानावर पडणार आहेत, पुन्हा एकदा रंगणार प्रश्नांचा रंगमंच, पुन्हा उलगडणार अनेकांचं भावनिक विश्व, पुन्हा रंगणार गप्पांची मैफल आणि पुन्हा कुणी तरी सामान्यातील सामान्य बनणार करोडपती. कारण लवकरच कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत असतो. आपल्या जीवनातील स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. मात्र प्रत्येकालाच त्याची स्वप्नं पूर्ण करता येतात असं नाही. मोजक्या मंडळींची स्वप्न साकार होतात. मात्र अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. महानायक आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव केबीसीशी नाव जोडलं गेलं. त्यामुळे या केबीसीला एक परिमाण लाभलं होतं. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. केबीसी सीझन ९ चा नुकताच समारोप झाला. विद्या बालन आणि युवराज सिंहच्या उपस्थितीत केबीसी-९चा अखेरचा भाग चांगलाच रंगला. वर्षानुवर्षे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे केबीसी शो नव्या उंचीवर पोहचला आहे. त्याला केबीसीचा सीझन९ अपवाद ठरला नाही. बिग बींचा अनोखा अंदाज, शोमध्ये येणारे स्पर्धक, त्यांच्या बिग बींचा संवाद, शोमधून समोर येणा-या विविध भावनिक गोष्टी यामुळे केबीसी-९ने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं. केबीसीपुढे इतर रिअॅलिटी शोची जादू फिकी पडली. यांत सलमानच्या बिग बॉस आणि इतर कॉमेडी तसंच सिंगिंग रिअॅलिटी शोचा उल्लेख करावा लागेल. केबीसी-9 ला मिळालेली ही प्रचंड लोकप्रियता पाहून केबीसीच्या निर्मात्यांनी या शोचं दहावं पर्व लवकरच रसिकांच्या भेटीला आणायचं ठरवलं आहे. याचे सूत्रसंचालन पुन्हा महानायकच करणार हे काही वेगळं सांगायलाच नको. त्यामुळे जस्ट वेट एंड वॉच.Life after KBC:केबीसीचा पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथेची पत्नी आहे मराठमोळी अभिनेत्री,कोण आहे ती जाणून घ्या?‘कौन बनेगा करोडपती ९’ हा शो टीआरपीच्या यादीत टॉपवर पोहोचला होता.टीआरपीच्या गणितात बिग बीनी सलमान खानच्या ‘बिग बॉस’ आणि अक्षय कुमारच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’लाही मागे टाकले होते.सलमानच्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा अकरावा सिझन पहिल्याच आठवड्यात टीआरपी रेटमध्ये केबीसीला टक्कर देऊ शकला नव्हता. टीआरपीरेटींच्या यादीत येण्यासाठी बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवसापासूनच स्पर्धकांची नौटंकी पाहायला मिळाली. मात्र ही नौटंकी ही केबीसीला टक्कर देऊ शकली नव्हती.तसेच खिलाडी कुमारचा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांना फारसा भावला नसल्याचे या टीआरपीरेटींग्सच्या आकड्यांमुळे स्पष्ट झाले होते. रसिकांनी दिलेल्या पसंतीमुळेच पुन्हा एकदा 'केबीसी 10' वे पर्व लवकरच सुरू रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे 'केबीसी 10'प्रोमोही टीव्हीवर झळकु लागले आहेत.